कर्जत तालुक्यातील बेलचिवाडीला चक्री वादळाचा तडाखा

घरांचे छप्परसह अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजचे खांब कोसल्याने गाव अंधारात; भात पिकांचे आतोनात नुकसान.

नेरळ–अजय गायकवाड

कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री 12:30 वाजेपासून अचानक मोठे चक्री वादळाने थैमान घालत अवध्या काही मिनिटात मोठ मोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. वीजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. तर घरावरचे छप्पर उडून गेल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्री वादळानी अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणला देखील या चक्री वादळाचा मोठा फटका बसला. यामुळे गावात दुसऱ्या दिवशी देखील अद्याप वीज पुरवठा सुरु झाला नसल्याचे समजत आहे. वादळी वाऱ्या सह झालेल्या तुफानी पावसाचा तडाखा बसून अनेक घराची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाचा तडाख्यात विद्युतपोल पडल्याने परिसर दोन दिवसा पासून अंधाररात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार दिनांक 30 रोजी अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरातरात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. महादू लोहकरे याच्यां घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून  दुदां कोकाटे  यांच्या विटभटटीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़. त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारूती चंद्रकांत पारधी यांच्या घराचे ही कौले पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका महावितरणला ही बसला असून वादळात विद्युतपोल पडल्याने दोन दिवसापासून विद्युत पुरवठाही बंद आहे.

परतिच्या पावसामुळे भात शेतीचे ही नुकसान झाले शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. शेतातच भिजून कुजल्याने हाता तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तींन हिरावून घेतल्याने बळीराज्याची यंदाची दिवाळी काळी झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास अंभेर पाडा परिसरात झालेल्या वादळी पावसाने घरांचे ही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महीना’ अशी स्थिती झाली आहे. मात्र शेतकऱ्यानच्या या परवडीकडे नेते, कार्यकर्ते, प्रशासन अजूनही निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर आल्याचे दिसत नाहीये. तसेच संबधित प्रशासकीय अधिकारी नुकसानग्रस्त भागात फिरकले नसल्याने कोणत्याही प्रकारची मदत आजतागायत शेतकऱ्यानं दिली नसल्याचे शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे.

रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या चक्री वादळाने गावातील घराचे मोठे नुकसान झाले आहे, शेती ही पाण्यात गेली विद्युत पोल पडल्याने दोन दिवसापासून गाव अंधारात आहे.  अद्यापपर्यंत कोणताही सरकारी अधिकारी गावात आलेला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत