कर्जत तालुक्यातील रस्ते मृत्यूचा सापळा

  • कर्जत तालुक्यातील रस्ते मृत्यूचा सापळा
  • कर्जत तालुक्यातील रस्ते खड्यात, अनेक रस्त्यांवर साचली डलकी
  • लोकप्रतिनीधींसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
  • खड्डे भरा अन्यथा खड्यांमध्ये वृक्षारोपणकरून आंदोलन करण्याचा स्थानिकांचा इशारा

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यात अनेक रस्ते खड्यात गेले असून अनेक रस्त्यावर मोठं मोठे खडे पडले आहेत. खड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवर मोठं मोठे अपघात घडत आहेत. तालुक्यातील रस्ते म्हणजे मृत्यू चा सापलाच बनला आहे.  परंतु लोकप्रतिनिधी सह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावर लोकप्रतिनिधी विरोधात मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे कर्जतच्या नेत्यांनी या खड्यांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 
तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्यमार्ग, कर्जत-चौक, नेरळ-कळंब जिल्हामार्ग, नेरळ शहरातील रस्ते, देवपाडा रस्ता,सावळे- हेदवली आशा अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेल्या  मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दैयनिय अवस्था झाली आहे. परिणामी रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु या रस्त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष करुन झोपेचे सोंग घेतल्याने प्रवासी, वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यातील अनेक रस्त्यावर आठ ते दहा फूटाचे खड्डे पडले आहेत. परंतु पाऊस सुरू झाल्यापासून अद्याप एकदाही खड्डे भरण्याचा मुहूर्त अद्याप बांधकाम विभागाला मिळाला नसल्याने खड्यांचे प्रमाण वाढले आहे.
या खड्यांमुळे कर्जत- कल्याण राज्य मार्गावर तर एकेरी वाहतुक  सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार वेळा खड्डे भरले जातात. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत होते. त्यामुळे बांधकाम विभाग प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांवर नियंत्रण नासल्यांने मोठ्या प्रमाणात निधी वाया जात आहे. आणि पुन्हा रस्त्यावर खड्डे पडतात. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.  त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्यावर त्वरीत खड्डे भरावे अन्यथा रस्ता रोको करून खड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशारा डिकसळ येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
नेरळ शहर, नेरळ-कळंब व इतर ग्रामीण भागातील रस्त्यांना महत्व नाही
कर्जत तालुक्यातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत , या संदर्भात बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे भरण्यासंदर्भात काय नियोजन आहे, अशी विचारणा केली असता कर्जत दहिवली पुलावर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे, आणि नंतर कर्जत ते डोणे या दरम्यान खड्डे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु नेरळ शहर आणि नेरळ-कळंब, व इतर काही ग्रामीण भागातील रस्त्यांचे काय? तर या रस्त्यांना विशेष महत्व नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे उप अभियंता साहेब तुम्ही या रस्त्यावर प्रवास करून बघा या रस्त्यांना किती महत्व आहे दिसेल तुम्हाला? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी,व प्रवाशांनी उपस्थित केला आहे. 
कर्जत -कल्याण राज्य मार्गावर डिकसळ भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरीत रस्त्यावरील खड्डे भरावेत अन्यथा रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल. 
– किशोर गायकवाड स्थानिक ग्रामस्थ
कर्जत शहरातील दहिवली पुलावर खड्डे भारण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर कर्जत-चौक, कर्जत डोने या रस्त्यावर खड्डे भरायला सुरुवात करण्यात येणार आहे. 
– अजयकुमार सर्वगोड उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत