कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात !

अजय गायकवाड , कर्जत
कर्जत तालुक्यात जुलै 2020 पासून नोव्हेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या 9 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.15 जानेवारी 2021 रोजी कर्जत तालुक्यातील पोशिर,साळोख तर्फे वरेडी,दामत,कोल्हारे,जिते, हुमगाव,वैजनाथ,कडाव या 9 ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज 23 डिसेंबर 2020 पासून भरण्यास सुरुवात होणार आहे.30 डिसेंबर 2020 ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असून त्या काळात 25 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत सुट्टी आहे.दाखल झालेले  नामांकन अर्ज यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे.तर वैद्य नामांकन पत्र मागे घेण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2021 ही आहे.15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान ईव्हीएम मशीन द्वारे करता येणार आहे.मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी कर्जत तहसील कार्यालयात होणार असून विजयी उमेदवार यांची यादी रायगड जिल्हाधिकारी 21 रोजी प्रसिद्ध करणार आहेत असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत