कर्जत तालुक्यात अदिवासी समाज मुलभूत सुविधांपासून वंचितच,  बेकरेवाडीतील रूग्णांना नेण्यासाठी आजही झोलीचा वापर

( कर्जत – कांता हाबळे )

कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या दोन दिवसांपूर्वी पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाईंकांना रात्रीच्या सुमारास झोळी करून रूग्णालयात न्हावे लागले.

Image may contain: 2 people, people standingही लाजीरवाणी गोष्ट असून स्वातंत्र्यांच्या ७० वर्षांतरही आदीवासींना अनेक समस्यांना सामोरे लावे लागत आहे. परंतू याकडे लोकप्रतिधींनीसह शासनाने दुर्लंक्ष केल्याचे यावरून दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यातील खाणींचीवाडी येथील आदिवासी कातकरी समाजातील विवाहित महिलेला आठवडा भरापूर्वी रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र रस्ता नसल्याने या महिलेला चादरींची झोळी करून नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बेकरेवाडीतही अशीच घटना घडली आहे. बेकरेवाडी येथील माजी ग्रामपंयात सदस्यां धाईबाई गोमा पारधी यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्या घराच्या पुरूष मंडळींनी त्यांना रूग्णालयात घेवून जाण्याचे ठरविले. परंतू रस्ता नसलल्याने या महिलेला झोळी करून न्हावे लागले. सुदैवाने धाईबाई पारधी या सुखरूप असून अशा परिस्थिंना अजून किती दिवस सामोरे जावे लागणार असा प्रश्‍न अदिवासींनी उपस्थित केला आहे.
माणगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकरेवाडी असून सुमारे २८ घरांची येथे वस्ती आहे. परंतू येथील आदीवासी समाजाला अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या वाडीत येण्यासाठी धड रस्ताही नाही, तसेच एकच विहीर असल्याने काही दिवसांत या येथे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा अनेक सुविधांपासून अदिवासी समाजाला वंचित रहावे लागत आहे.
निवडणुका आल्या की, अनेक पुढारी आणि उमेदवार आदिवासी वाडयापांडयांवर गस्त घालून बसतात. मात्र अशा पुढार्‍यांना आता आदिवासी समाजाचे होणार हाल दिसत नाहीत का ?असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आदिवासींच्या लोकसंख्येनुसार राज्याच्या बजेटमध्ये अर्थिंक तरतूद केली जाते. विकासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. तसेच करोडो रूपयांचा खर्च दाखविला जातो. असे असतानाही मात्र आदिवासींच्या विकासाचा लवलेशही कुठेच दिसत नाही. हे कर्जत तालुक्यात विदारक वास्तव्य आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत