कर्जत तालुक्यात आणखी एका तरुणाच्या मृत्यूने खळबळ; विहिरीत आढळला मृतदेह

नेरळ : अजय गायकवाड

कर्जत तालुक्यात आणखी एका तरुणाचा मृत देह सापडल्याने खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यात अनेक आत्महत्या आणि खुनाच्या घटना समोर येत असतानाच आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहुची वाडी गावाबाहेर असणाऱ्या विहरित एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडून आला आहे. दरम्यान घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झालेत.

चाहुचीवाडी परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याला आपल्या शेतावर जात असताना विहरित एका तरुणाचा मृत देह पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने ग्रामस्थांनी एकाच गर्दी केली होती. तर या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देताच स्थानिक पोलिसांसह नेरळ पोलीस देखील घटनास्थळी हजार झाले होते. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत तरंगत असणाऱ्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. काही तासातच या मृत देहाची ओळख पटवण्यात नेरळ पोलिसांना यश आले होते.

सदर मयत तरुण हा घडलेल्या घटनेपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येत असलेल्या पाटगाव येथील राहणारा असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी पाटगाव गावातील राहणारा 22 वर्षीय दिलीप दशरथ बनसोडे हा 12 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता. तो दोन दिवस घरी आलाच नसल्याने त्याचा शोध सुरु असताना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चाहुचिवाडी गावाबाहेर एका तरुणाचा मृत देह सापडला असल्याची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि बेपत्ता दिलीप बनसोडे याची माहिती समोर आली.

दिलीपने आपला मोबाईल, गाडी, पॉकेट सर्व साहित्य हे घरीच ठेऊन बाहेर पडल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. तर तो नुकताच बदलापूर येथे जॉब ला देखील लागल्याचे समोर आले असून गावातील काही मंडळींशी तो चांगल्या प्रकारे भेटला बोलला होता असे देखील सांगण्यात आले होते. एकूणच पोलिसांच्या प्रथम दर्शनी ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे निशाण दिसत नव्हते तर पायात बूट देखील तसेच होते. पाण्यात बुडल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत झाल्याने, दोन दिवस पाण्यात राहून त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.

सदर घटने बाबत आता नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस हे अधिक तपास घेत असून तालुक्यात खुनाच्या व आत्महत्यांच्या सतत घटना समोर येत असल्याने तालुका हादरून गेला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत