कर्जत तालुक्यात निकृष्ट काम काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची  मागणी 

कर्जत (रायगड) : विकास मिरगणे

कर्जत तालुक्यात रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. निकृष्ट  काम करून शासनाचे शेकडो कोटी रुपये वाया घालविणाऱ्या ठेकेदारा विरोधात खासदार श्रीरंग आप्पा बारणे संतप्त झाले आहेत. कर्जत  नेरळ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला  ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण निर्माण झाली आहे.  रस्ता आहे की खड्डा ,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ ,कर्जत पळसदरी आणि कर्जत मुरबाड अशा अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.  या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महाराष्ट्र न्यूज २४ ने यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठविला. प्रशासन आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्यामुळे ठेकेदारावर कारवाई केली जात नाही. कर्जत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकमेकांच्या  हातात हात घालून ठेकेदारी करतात हे काही लपून राहिलेले नाही. रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांची भेट घेऊन अशा ठेकेदारांवर कारवाई करावी आग्रही भूमिका खासदार बारणे यांनी घेतली आहे.

कर्जत पळसदरी रस्त्या संदर्भात  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून या रस्त्याची चौकशी करावी आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची  मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे  केली आहे. कर्जत तालुक्यात ठेकेदारांचे रॅकेट आहे. कोणी कोणते काम करायचे हे अगोदरच ठरले असते . अगदी खड्डे भरण्यापासून नवीन काम करण्यापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांचे साटेलोटे आहे. आणि हे काम करणारी मंडळीच राजकीय पक्षांची पदाधिकारी असल्याने कर्जत-नेरळ, कर्जत-मुरबाड आणि कर्जत-खोपोली रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे  फावले आहे. आता खासदार श्रीरंग बारणे यांनी  याप्रकरणी लक्ष  घातल्यानांतर आता तरी शासन याठेकेदारांवर कारवाई करणार का? हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत