कर्जत तालुक्यात ४६१५ लाभार्थी शौचालयाच्या अनुदानापासून वंचित !

( कर्जत – कांता हाबळे )

रायगड जिल्ह्यासह कर्जत तालुक्यात अनेक ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या असल्या तरी कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाभार्थ्यांनी घरगुती शौचालय बांधले आहेत. परंतु

शौचालय बांधून एक वर्ष उलटूनही या लाभार्थ्यांना अद्याप पूर्ण अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. 12 हजारांपैकी ६ हजार या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु ६ हजार रुपये अजून या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत. सुमारे ४६१५ लाभार्थ्यांना २ कोटी ७६ लाख ९० हजार रुपये इतके अनुदान देणे बाकी असल्याचे कर्जत पंचायत समितीकडून सांगण्यात आले.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येकाच्या घरी घरगुती शौचालय असावे, या करिता शासनाने प्रत्येकी 12 हजार रुपये मंजूर केले आहेत. 2012 च्या बेसलाईन सर्वेनुसार ज्या नागरिकांच्या

 घरी शौचालय नाही. अशा सर्व नागरिकांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. अनेकांनी शौचालय बांधण्यास सुरु केले आणि त्यानुसार जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या. त्याचप्रमाणे अनेक ग्रामपंचायत 

हद्दीत अनेक लाभार्थ्यांनी घरगुती शौचालये बांधलीही आहेत. परंतु १ वर्ष उलटूनही होऊनही लाभार्थी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. या लाभार्त्यांच्या खात्यात ५ महिन्यांपूर्वी अर्धे अनुदान म्हणजे ६ हजार रुपये जमा करण्यात आले. परंतु ६ हजार रुपये अध्याप जमा करण्यात आले नाहीत.
कर्जत मधील अनेक ग्रामपंचायतीतुन कर्जत पंचायत समितीकडे शौचालयाची तपासणी करून सुमारे ४ हजार ६१५ प्रस्ताव अनुदानासाठी सादर केले आहेत. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने शौचालय बांधकाम पूर्ण होऊनही या लाभार्थ्यांना शासनाकडून अर्धे अनुदान प्राप्त झाले नाही. कुटुंबाचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी अनेकांनी मोलमजुरी करून हातचे पैसे खर्च करून शौचालय बांधले. परंतु त्यांना अजूनही शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याने लाभार्त्यामध्ये नाराजी पसरली आहे. यासाठी कर्जत पंचायत समितीने याबाबत शासनाकडे त्वरित पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ज्या लाभार्थ्यांचे घरगुती शौचालय बांधून पूर्ण आहेत. त्यांच्या बँक खात्यात उर्वरीत अनुदान जमा करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत