कर्जत नगर परिषदेच्या अभियंत्यांवर कारवाईचे आदेश कर्जतमध्ये कनिष्ठ अभियंत्याने केली मुख्याधिकाऱ्याची सही

(कर्जत – संजय मोहिते )

आपले सरकार या पोर्टल वरून दाखल केलेल्या तक्रारीला कर्जतच्या मुख्यधिकारी ऐवजी कनिष्ट अभियंता याने मुख्यधिकारी यांच्या सहीने उत्तर दिल्याने सादर कनिष्ठ अभियंता हे अडचणीत आले असून तक्रादाराने या अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.तर शासनाकडून याची गंभीर दाखल घेऊन त्या अभियंत्या विरुद्ध सखोल चौकशी करण्याचे आदेश कलेक्टर रायगड यांनी दिले आहेत.तसेच सदर अभियंत्या विरुद्ध तक्रारदार हे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करत असून या अभियंत्याला तात्काळ निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे.
आपले सरकार’ या शासकीय पोर्टल वर कर्जतचे वकील हृषीकेश जोशी यांनी कर्जत मधील उल्हास नदीच्या बाजूला असलेल्या सर्वे नंबर ४२/१ या जागेवर उभ्या राहिलेल्या इमारतींविषयी नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केल्याप्रकरणी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती.साध्य स्थिथती या इमारतीमध्ये बंधन बँक हि भाडे तत्वावर असून त्यांची हि फसवणूक जाहली असल्याचे दिसून येत आहे. परंतु जोशी यांच्या तक्रारीला मोघम उत्तर देऊन आणि मुख्यधिकारी यांची स्वतः सही करून निकाली काढण्याचा डाव नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता निलेश चौडीये यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तक्रार दार ऋषिकेश जोशी यांच्या हि बाब लक्षत आल्यानंतर त्यांनी त्या काळात कोकण आयुक्त यांनी कर्जत नगरपरिषदेवर 26 वर्षीय आयएएस अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली होती त्यांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली . अहवालावर असलेली सही ही प्रशिक्षणासाठी आलेल्या मुख्याधिकारी यांनी न करता नगरपरिषद मधील कनिष्ठ बांधकाम अभियंता निलेश चौडिये यांनी केल्याचे जोशी यांनी मुख्यधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी पडताळणी करून या संबंधी पत्र लिहून प्रशासनाला कळवले होते. सदर गंभीर घटनेची प्रशासनाकडून गंभीर पणे दखल घेतली गेल्याने संबंधित अभियंत्याची अडचण वाढली व प्रशिक्षनासाठी आलेले अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलेश चौडिये यास कारणे दाखवा नोटीस पाठवून त्याने उत्तर न दिल्याने कारवाई केल्याचे समोर आले आहे सदर कारवाई द्वारे दिलेल्या आदेशात चौडिये याची पुढील दोन वर्षांची पगारवाढ रोखून धरण्यात अली असून इतर काही अधिकार गमावण्याची वेळ चौडिये यांच्यावर अली आहे. तसेच रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवशी यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन वादग्रस्त इमारतीप्रश्नी परत एकदा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश नव्याने आलेले मुख्याधिकारी रामदार कोकरे यांना दिले असून तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कोणतेही अधिकार प्रत्ययोजित केलेले नसताना त्यांचे वतीने वादग्रस्त सही करून आपले सरकार पोर्टल वर मोघम अहवाल देणाऱ्या कनिष्ठ अभियंता निलेश चौडिये याच्या अडचणीत भर पडली आहे. यासंबंधी जोशी यांनी केलेल्या तक्रारीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल हे वरील घटनेचा सखोल तपास करत असून जोशी यांनी प्रशासनाकडून झालेल्या कारवाई वर विश्वास व्यक्त केला आहे. आपले सरकार वरील या प्रकरणाची गंभीर दखल कोकण आयुक्त यांच्या कार्यालयाकडून घेतली असून कोकण आयुक्त यांनी याबाबत दखल घेण्यास नगरविकास शाखेस सूचित केल्याने प्रशासनाने पुढील चौकशी व फौजदारी प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करून 15 जानेवारी 2018 पर्यत तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याने आजवर भोंगळ कारभार करणाऱ्या प्रशासनाचे व कर्जतच्या स्थानिक राजकारणी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरनाचा संदर्भ घेऊन याच अभियंत्याने इतरही काही अनधिकृत व विवादास्पद प्रकरणे हाताळली असल्यास त्यावर काही कारवाई होणार नाही ना अशी भीती अनेकांच्या मनात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत