कर्जत नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा

कर्जत : रायगड माझा वृत्त 

युती आणि आघाडी कडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केले गेलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. थेट नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्ण जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा पराभव केला . अठरापैकी दहा जागा जिंकून कर्जत नगर परिषदेची सत्ता काबीज केली. या निवडणुकीत कर्जत मधील राष्ट्रवादीचे बालेकिल्ले युतीकडून उध्वस्त केले गेले. आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्याने हि निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. सुवर्णा जोशी यांना 9972 मते, तर तर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या उमेदवार अॅड. प्रतिक्षा लाड यांना 7363 मते मिळाली. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा 2609 मतांच्या फरकाने विजय झाला.
या विजया नंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत