कर्जत : नदीमध्ये बुडून दोन शाळकरी मुलींचा मृत्यू

नेरळ : अजय गायकवाड

कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणी राहणाऱ्या दोन मुलींचा पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मायरा सर्फराज पटेल (वय 9वर्ष) आणि तय्याबा सोहेल ताडे (वय 7वर्ष) अशी या मुलींची नावे आहेत.

आज सकाळी या मुली रविवार असल्याने सुटीच्या दिवशी आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. आपल्या आईची नजर चुकवून ह्या दोघी नदीच्या पाण्यात उतरल्या. पाण्यात उतरल्यानंतर नदीच्या पात्रातील खोलगट भागात ह्या दोघींचा पाय गेला. नदीच्या खोलगट भागात ह्या दोघी खोलवर गेल्या. ह्या दोन्ही मुलींच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा पाण्यामध्येच श्वास कोंडला गेला. आणि त्यातच ह्या दोघींचा मृत्यू झाला.

दरम्यान आपल्या दोन्ही मुली आपल्याला नदीवर सोडून पुन्हा घरी गेल्या असाव्या असे त्यांचा आईला वाटले. कपडे धुवून झाल्यानंतर ह्या दोघींची आई घरी गेली. मात्र आपल्या दोन्ही मुली घरी आल्याचं नसल्याचे समजले. त्यानंतर घरातल्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.  नदीवर या दोघी आईसोबत गेले असल्याने प्रथम त्यांनी नदीवरचा ह्या दोघींचा शोध घेतला. तेंव्हा या  दोघी नदीच्या दगडांच्या कपारीमध्ये मृतावस्थेत दिसण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी या दोघींना पाण्याबाहेर काढण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत