कर्जत पंचायत समितीच्या संगीत खुर्चीचा मान प्रदीप ठाकरेंना

 

 

(कर्जत – भूषण प्रधान)

कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनचे प्रदिप ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत पंचायत समितीचे सभापती अमर मिसाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेकडे दिला होता. आज सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी कर्जत पंचायत समिती सभापतीपदी प्रदिप ठाकरे बिनविरोध करण्यात आली आहे. 
नामांकन अर्ज भरायची वेळ ही 11 ते 1 वा. अशी होती शेवसेनचे प्रदिप ठाकरे यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक वेळेत निवडणूक अधिकारी यांच्या कडे सादर केला. यावेळी नामनिर्देशन वेळेच्या आत फक्त एक मेव अर्ज आल्या असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल हे स्पष्ट झाले.दुपारी 2 च्या सुमारास निवडणूक अधिकारी यांनी दुसऱ्या अन्य कोणाचाही उमेदवारी नामांकन अर्ज नसल्याने पीठासीन निवडणूक अधिकारी दत्ता भडकवाड यांनी शिवसेनेचे प्रदीप ठाकरे हे कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. सभापती निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून पीठासीन अधिकारी दत्ता भडकवाड, कर्जत गटविकास अधिकारी शब्बाना मोकाशी, सी.एच. रजपूत, सुनील अहिरे ,विस्तार अधिकारी कर्जत पंचायत समिती यांनी निवडणूकीचे काम पाहिले.
यावेळी प्रदिप ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पंचायत समिती सदस्य, शिवसेनचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे,मनोहर थोरवे,संतोष भोईर,बालाजी विचारे,संभाजी जगताप,संदीप बडेकर आदी शिवसेनेचे नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते कर्जत पंचायत समितीत उपस्थित होते.

चौकट
विशेष म्हणजे कर्जत पंचायत समितीच्या आवारात एक नवीन राजकीय चर्चेला उधाण आले . माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नवनिर्वंचित सभापती प्रदिप ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत पंचायत समितीत हजेरी लावली .आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या सोबत छायाचित्रे काढून एक नवीन राजकीय भूकंपाचा धक्का देत .उपस्थिताच्या चर्चेला एक नवीन विषय दिला .आगामी काळात सुरेश टोकरे शिवसेने सोबत जाणार अस चित्र एकंदरीत पाहायला मिळाले .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत