कर्जत भाजप मंडल पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप

नेरळ : महाराष्ट्र NEWS 24 (प्रतिनिधी)

कर्जत तालुका भाजप मंडल मधील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंजूर केल्या आहेत. त्यानुसार सर्व सेलच्या कर्जत तालुक्यातील पदाधिकारी यांना भाजप कर्जत तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती पत्र देण्यात आले.

भारतीय जनता कर्जत तालुका मंडल यांच्या वतीने नेरळ येथील सन्मान हॉटेल मध्ये पक्षाच्या कार्यकारिणी मधील नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी भाजप कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अविनाश कोळी, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जेष्ठ कार्यकर्ते नितीन कांदळगावकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक बल्लाळ जोशी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेल आणि विविध मोर्चे यांच्या पदाधिकारी यांची निवड यापूर्वी झाली आहे. कर्जत मंडलाने सर्व संमतीने केलेल्या अंतिम यादीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर भाजप कर्जत तालुका मंडल सरचिटणीस म्हणून पंकज पुंडलिक पाटील यांना तर तालुका मंडल उपाध्यक्ष म्हणून निलेश पिंपरकर, पंढरीनाथ पिंपरकर, गायत्री परांजपे, कर्जत तालुका मंडल खजिनदार म्हणून महेश घाडगे आणि तालुका मंडल चिटणीस म्हणून प्रतिभा बारणे, दुर्गा गावंडा, कीर्ती थोरवे, रमेश जाधव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

तर पक्षाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी पाटील,अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून फुरकान कुरेशी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, कामगार आघाडी संयोजक रमेश कडव, सोशल मीडिया संयोजक रमाकांत जाधव, व्यापारी सेल संयोजक सुनील सोनी, अनुसूचित जमाती सेल संयोजक राहुल मुकणे, मच्छीमार सेल संयोजक कल्पेश राणे, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक गोरख शेप, जेष्ठ कार्यकर्ता सेल संयोजक माधव गायकवाड, वैद्यकीय सेल संयोजक डॉ भगवान कराळे, भटक्या जाती मोर्चा संयोजक लक्ष्मण आखाडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष म्हणून वर्षा बोराडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

त्याचवेळी भारतीय जनता पार्टी कर्जत शहर अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस म्हणून प्रकाश पालकर यांची तर कर्जत शहर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून सरस्वती चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून मयुरेश शितोळे, नेरळ शहर अध्यक्ष म्हणून अरुण नायक आणि नेरळ शहर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून नम्रता कांदळगावकर, यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजप नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून संदीप म्हसकर, तर पाथरज जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून विलास थोरवे, बीड जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून तानाजी पाटील यांच्यासह पंचायत समिती गणाचे अध्यक्ष यांच्या देखील नियुक्त्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत