(रायगड माझा वृत्त)
सोमवारी कर्जत येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत मार्केट यार्ड ते पोसरी रिटर्न अशी पाच किलोमीटर ची स्पर्धा होती.
या स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुला गट अशी विभागणी करण्याट आली होती. सकाळी ६.४५ वाजता प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष्या रजनी गायकवाड यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सुमारे २५०० विध्यार्थी धावपटू होते. मॅरेथॉनमध्ये १९ वर्षाखालील मॅरेथॉनचेल कल्पेश कामडी आश्रमशाळा माणगाववाडी, १७ या वर्षाखालील मध्ये दुर्गा लोभी, देवेंद्र सांबरी याची द्वितीय क्रमांक आला आणि पी. एम. पी बीड शाळेतील विद्यार्थिनी सोनू काळूराम कातकरी इयत्ता ९ वी हिचा द्वितीय क्रमांक आला. कर्जतच्या १६ वर्षाखालील मुलींमध्ये अधिक जलद गतीने धावणाऱ्या या दोन मुली ठरल्या आहेत.
शिक्षिका नीलम मिसाळ आणि ममता म्हात्रे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.
हे सर्व विद्यार्थी सेवा सहयोग फौंडेशन अंतर्गत चालणारा क्रीडा विकास प्रकल्प कर्जत येथे प्रशिक्षणाला येतात, क्रीडा विकास प्रकल्पाचे समन्वयक म्हणून नारायण मिसाळ काम करतात तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.