कर्जत -मुरबाड राज्यमार्गावर पोशीर नदीवरील कळंब पूल धोकादायक

  • बांधकाम विभाग झोपेत ; अपघात झाल्यास जबाबदार कोण?
  • पुलावरील लोखंडी सळया निघाल्या बाहेर, अपघाताची शक्यता
  • पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नेरळ : कांता हाबळे

कर्जत – मुरबाड राज्यमार्गावरील कळंब पुलावर स्लॅबच्या लोखंडी सळया बाहेर निघाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या लोखंडी सळया वाहनांच्या टायरमध्ये जाण्याची शक्यता असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या पुलाचे कठडे ही कमकुवत झाले आहेत. हा पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत -मुरबाड हा महत्वाचा राज्यमार्ग म्हणून ओळखला जातो. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून जास्त प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. असे असताना बांधकाम विभागाने या पुलाची दरवर्षी देखभाल ठेवणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या पुलावर स्लॅब च्या लोखंडी सळया अनेक ठिकाणी बाहेर निघाल्याने रस्ताच धोकादायक झाला आहे. याचा त्रास स्थानिक आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम बांधकाम विभागाने केले होते. या ठिकाणीही खडी आणि माती टाकली होती. परंतु दोन दिवसातच पुन्हा या लोखंडी सळयांनी डोकेवर काढले. आणि आता तर मोठ्या प्रमाणात सळया बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे वाहन जोरात असल्याने अपघात घडल्यास वाहन नदीतही पडून शकते.  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी कोणतीही दुर्दवी घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाय योजना कराव्यात तसेच या पुलावर सरंक्षण कठडे ही कमुवत झाले आहेत.  याचीही दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
अनेक महिने या रस्त्यावर सळया बाहेर निघाल्या असतांना याकडे बांधकाम विभागाने जाऊन बुजून दुर्लक्ष करीत आहे.. त्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधीनी आता हा रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी प्रवासी वाहन चालकांकडून केली जात आहे. जेणे करून येथे कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये हीच अपेक्षा.
या संदर्भात कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी मोबाईल द्वारे कर्जत – मुरबाड राज्यमार्गावर असलेल्या कळंब पुला संदर्भात आणि पुलावर निघालेल्या लोखंडी सळया यावर काय उपाय योजना करणार अशी विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.
या मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळया टायर ला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळया चुकवताना अपघात जोरदार अपघात होऊ शक्यतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती होणे अवश्यक आहे. केशव तरे, वाहनचालक
कळंब पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील लोखंडी सळया बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे वाहनांना अपघात होऊ शकतो, त्यामुळे वेळीच बांधकाम विभागाने या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे काम करून रस्ता चांगला करावा अन्यथा कोणतीही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच जबाबदार धरण्यात येईल. – रवींद्र बदे, ग्रामस्थ, कळंब
कर्जत तालुक्यातही अनेक पुल धोकादायक स्थितीत आहेत. त्या पुलांची लवकरात लवकर पाहणी करण्यात यावी. व त्यावर उपाययोजना करावी. अन्यथा दुर्घटना घातल्या अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल. मनोहर कदम – पर्यावरण विभाग अध्यक्ष,  रायगड जिल्हा
कर्जत तालुक्यात अनेक पूल धोकादायक
  • कर्जत- मुरबाड राज्यमार्गावरील कळंब पूल
  • नेरळ- कळंब रस्त्यावरील दहिवली पूल
  • पोशीर नदीवरील पोशीर -माले पूल
  • कळंब- वांगणी रस्त्यावरील साळोख पूल
  • पथरज रस्त्यावरील पूल
असे अनेक पूल कर्जत तालुक्यात धोकादायक आहेत, अनेक रस्त्यांवरील पुला संरक्षक कठडे च नसल्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिकांना आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत