कर्जत येथील बालसुधार गृहातील मुलांना कपडे वाटप

नेरळ : अजय गायकवाड

नेरळ शहरातील व्यापारी वेल्फेअर फेडरेशन यांच्या पुढाकाराने कर्जत शहरातील दहिवली येथील बालसुधार गृहाला भेट देऊन येथील मुलांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी वेल्फेयर फेडरेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

नेरळ व्यापारी वेल्फेयर फेडरेशनचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांच्या संकल्पनेतून नेरळ व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप म्हसकर यांच्याहस्ते कर्जत दहिवली बालसुधार गृहातील 32 मुलांना पॅन्ट आणि शर्ट असे कपडे वाटप करण्यात आले.यावेळी या बालसुधार गृहाचे अधीक्षक खानविलकर तसेच नेरळमधील अनिल जैन, बंडू क्षीरसागर तसेच अनेक शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत