कर्जत रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुनील सोनी तर सेक्रेटरीपदी सचिन ओसवाल यांची निवड 

कर्जत : विकास मिरगणे

रोटरी क्लब कर्जतच्या अध्यक्षपदी  उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनी यांची निवड करण्यात अली. कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाईन पढताईने हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

सुनील सोनी यांची यशस्वी उद्योजक,  समाजसेवक म्हणून ओळख आहे. राजवाडा ट्रस्ट च्या मध्यमातून त्यांनी आजवर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आदिवासी विभागात वैद्यकीय सुविधा  सेवा पुरविणे, ऍम्ब्युलन्स उप्लब्ध करून देणे अशी कामे त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून केली आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुनील सोनी यांची रोटरीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द देखील रोटरीची परंपरा पुढे नेणारी असेल असा विश्वास अनेकांनी  व्यक्त केला. वैद्यकीय मदतीबरोबर पर्यावरण, आदिवासी कल्याण ,आणि शिक्षण क्षेत्रात विशेष काम करणायचा मनोदय त्यांनी  जाहीर केला.

सुनील सोनी यांच्याप्रमाणे कर्जत शहरातील व्यावसायिक सचिन  ओसवाल यांची रोटरी क्लबच्या सेक्रेटरी म्हणून  नियुक्ती करण्यात आली. या ऑनलाइन कार्यक्रमाला सर्व रोटेरियन परिवार  तसेच अनेक मान्यवर, कर्जतच्या  नगराध्यक्षा  सुवर्णा जोशी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, भाजप नेते सुनील गोगटे, जितेंद्र ओसवाल, जितेंद्र परमार, विशाल शाह यांच्यासह अनेक जण ऑनलाईन उपस्थित होते.

रोटरी क्लब कर्जतची समाजसेवेची मोठी परंपरा असून नवीन पदाधिकारी त्यादृष्टीने कसे काम करतात हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत