कर्जत विधानसभेचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराची नेरळ मध्ये सुरुवात

नेरळ: अजय गायकवाड 
कर्जत विधानसभा निवडणुकीचे शिवसेना -भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ आज नेरळचं ग्रामदैवत असलेलं चेडोबा देवस्थान येथे श्रीफळ वाढवत प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
या वेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारींसह अनेक महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व  कार्यकर्तांनी एकत्रित येत बाजार पेठेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत प्रचाराची सुरुवात केली. प्रचाराला महा युतीचे महिला कार्यकर्ते आणि तरुणांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून आला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत