कर्जत शहरातील समस्या सोडवा; अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू

कर्जत : रायगड माझा वृत्त 

कर्जत शहरातील नळपाणी योजनेसंदर्भातील विविध प्रश्नांसह अन्य नागरी प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतलाय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची भेट घेऊन याबबत चर्चा केली. आठ दिवसात नागरी समस्या आणि पाणीपुरवठा बाबतच्या तक्रारींना न्याय न दिल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिलाय.

         

मनसेच्या वतीने कचेरी येथील पाण्याच्या टाकीला सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली, त्याचवेळी पाण्याच्या जलकुंभाचे उघडे असलेले झाकण त्वरित लावावे. तसेच आकुर्ले,भिसेगाव, गुंडगे येथील जलकुंभ येथे होणारी पाणी गळती दूर करणे आणि तडे गेलेल्या जलकुंभ यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली. या सोबतच इतर अनेक समस्यांचा पाढाच मनसेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी याच्या समोर वाचला. नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या आठ दिवसात सोडवण्याची मागणी मनसेने केली आहे. या सर्व मागण्याचे निवेदने दिले असून येत्या आठ दिवसांत ह्या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर पूर्व कल्पना न देता थेट आंदोलन करू असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष समीर चव्हाण यांनी दिला. दरम्यान शिष्टमंडळाला आपली भूमिका मांडताना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपण नळपाणी योजना ही कर्जत शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा योजना बनविण्याचे आमचे उद्धिष्ट असल्याचे सांगत आपण पालिकेच्या सर्वांना सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांना स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याबाबत समस्यांना सामोरे जावे लागणार नाही अशी कामे करण्याचे आमचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, मनसेचे कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, सरचिटणीस प्रसन्न बनसोडे यांनी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत