कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा हल्लाबोल

व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या निवेदन

कर्जत : कांता हाबळे 

कर्जत तालुक्यात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे या मागणीसाठी कोंढाणा व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कर्जत बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना देण्यात आले आहे.
कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा हल्लाबोल

 

दोन दिवसांपूर्वी कर्जत मधील कोंढाणा टाईम्स व्हाट्सअप ग्रुपवर तालुक्यातील खड्यांविषयी चर्चा सुरू होत्या. परंतु या ग्रुपवर बांधकाम विभागाचे अधिकारी असूनही कोणत्याही मॅसेज ला उत्तर देत नसल्याने ग्रुपवरील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारण्याचे ठरविले जाते. सोमवारी ग्रुपवरील अनेक नागरिकांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर हल्लाबोल केला. व रस्त्यावर पडलेल्या खड्यांसंदर्भात जाब विचारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. व यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरले जातील आणि रस्ते चांगल्या दर्जाचे केले जातील असे आश्वासन यावेळी उप अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश लाड,  नगरसेवक संतोष पाटील, संतोष भोईर, माजी नगरसेवक सुनील गोगटे, दीपक बेहरे, श्रीराम पुरोहित, रमाकांत जाधव, प्रदीप गोगटे, अमित खैराट, दादा गायकवाड, राजन भोळे, प्रभाकर गंगावणे आदी यावेळी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या :
  • कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे करावे
  • रस्त्यावर योग्य पद्धतीचे मटेरियल वापरून काम करावे
  • रस्त्याची दुरवस्था झाल्यास ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे, 
  • यापुढे सर्व रस्ते सिमेंट कोंक्रेटचे व्होवेत
  • रस्ते बांधणीकरिता अर्थ संकल्पात भरीव निधी उपलब्ध करण्यात यावा. 
  • आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत