कर्जबाजारी शेतकरी आणि शहीद कुटुंबीयांसाठी ‘बिग बी’ कडून अडीच कोटी!

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

महानायक अमिताभ बच्चन जेवढे मोठे कलावंत आहेत, तितकेच ते संवेदनशील म्हणूनही ओळखले जातात. देशातील अनेक दुर्घटनांवेळी त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. आता अमिताभ बच्चन यांनी देशातील कर्जबाजारी शेतकरी आणि शहीद कुटुंबीयांनाही मदतीचा हात दिला आहे.

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन एक पाऊल पुढे टाकत, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांची मदत दिली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्याचसोबत, शहीद सैनिकांच्या कुटुंबांनाही आर्थिक मदतीची घोषणा अमिताभ बच्चन यांना केली. अमिताभ बच्चन हे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिली आहे. कर्जबाजारी झालेल्या 200 शेतकरी कुटुंबांना दीड कोटी रुपये, तर 44 शहीद सैनिकांच्या कुटुंबाना एक कोटी रुपये अशी अडीच कोटींची मदत अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.

बँकांकडून 200 कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती आणि त्यांच्यावरील कर्जाच्या रकमेबाबत आकडेवारी मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.

संदर्भात बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “शहीद सैनिकांचे कुटुंबीय आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीमुळे व्यथित झालोय. आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा निर्णय घेतला.”दरम्यान, याआधी अमिताभ बच्चन यांनी केरळमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली होती. तसेच, अत्यावश्यक वस्तूही अमिताभ बच्चन यांनी केरळमधील नुसानग्रस्तांना दिल्या होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.