कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि पत्नी अनिता यांनी रचला इतिहास

बंगळुरु : रायगड माझा वृत्त 

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि पत्नी अनिता यांनी रचला इतिहास

कर्नाटकमध्ये झालेल्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएसने विधानसभेच्या दोन्ही तर लोकसभेच्या मंड्या आणि बेल्लारी या जागेवर विजय मिळवला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी या निवडणुकीत इतिहास रचला आहे.

पहिल्यांदा कोणता मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह विधानसभेत प्रवेश करणार आहे. या विजयानंतर अनिता कुमारस्वामी या मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी एकत्र विधानसभेत दिसणार आहेत. कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी याआधी पहिल्या सदनच्या सदस्य होत्या. कुमारस्वामी रामानगर येथून आमदार होते तेव्हा अनिता या मधुगिरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होत्या. पण मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अनिता यांच्यासाठी हा पहिला योग असणार आहे.

रामानगर विधानसभेच्या जागेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात होती. त्यांचा हा विजय निश्चित मानला जात होता. अनिता कुमारस्वामी यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मोठी आघाडी घेतली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार एल चंद्रशेखर यांचा 1,09,137 मतांना पराभव केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत