कर्नाटकात नाराज कॉंग्रेस आमदारांची बंडखोरी

बेंगळुरू : रायगड माझा

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवस होतात, तोच कर्नाटकात नाराज कॉंग्रेस आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. बंडखोर आमदारांची गुरुवारी एम बी पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीनंतर सतीश जारकिहोली यांनी सांगितले, की मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही नाराज आहोत. आणि आमची नाराजी पक्षाला योग्य प्रकारे कळवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. लवकरच आमची आणखी एक बैठक होईल. सतीश जारहिकोली हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिवही आहेत. अशी बैठक घेण्यात काहीही गैर नाही, असे स्पष्ट करून जारहिकोली यांनी सांगितले, की आमची बैठक पक्षाच्या हितासाठीच होती.

बुधवारी कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, त्यात कॉग्रेसच्या 25 आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली. मात्र अनेक ज्येष्ठ आमदारांना, ज्यात काहीजण पूर्वीच्या सिद्धारमैया सरकारमध्ये मंत्री होते, डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. नाराजांमध्ये एम बी पाटील, दिनेश गुडूराव, रामलिंगा रेड्डी, आर रोशन बेग, एच के पाटील, तनवीर सैत, सतीश जारहिकोली, यांचा समावेश आहे.

गुरुवारी एम बी पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाराजांपैकी एमटीबी नागराज, सतीश कारहिकोली, रोशन बेग आणि सुधाकर यांनी भाग घेतला.

ज्येष्ठ नेत्यांचे नाराज होणंए स्वाभाविक आहे. असे सांगून डीके शिवकुमार यांनी सांगितले, की पक्षाने सर्व विकल्प खुले ठेवले आहेत आणि माझा हायकमांडवर विश्‍वास आहे.

काही तणाव असल्याचे मान्य करत मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की कॉग्रेस नेते योग्य निर्णय घेतील असा मला विश्‍वास आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत