कर्नाटकात सरासरी 64% मतदान; 46 वर्षांत फक्त दोनदा 70% पेक्षा जास्त मतदान

बंगळूरू: रायगड माझा

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांवर शनिवारी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदान झाले. दोन मतदारसंघांमधील निवडणूक पुढे ढकलली आहे. दरम्यान, 4.90 कोटी मतदारांपैकी 64 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निकाल 15 मे रोजी जाहिर करण्यात येईल. यावेळी 72 लाख नवे मतदार होते. यातील 3 टक्के म्हणजे 15.42 लाख मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत.

महत्वाचे ……

-सिद्धारमैया यांनी म्हैसुरूच्या वरुणामध्ये मतदान केले. ते म्हणाले, “येदियुरप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. काँग्रेस 120 पेक्षा जास्त जागा जिंकणार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, काँग्रेस पक्ष बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत येईल.”

– बेळगावीच्या एका मतदान केंद्राबाहेर मुस्लिम महिलेला रोखण्यात आले. वास्तविक, महिला बुरख्यात आली होती आणि ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला सांगण्यात आले. यानंतर महिला अधिकाऱ्याने केबिनमध्ये त्यांची ओळख पटवली.

– ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी कलबुर्गीच्या बसवानगरच्या बूथ नंबर 108 मध्ये मतदान केले.

– सिद्धगंगा मठाचे प्रमुख 111 वर्षीय श्री शिवकुमार स्वामी यांनी तुमकुरमध्ये आपल्या अनुयायांसोबत मतदान केले.

– एच. डी. कुमारस्वामी यांनी पत्नी अनितासोबत रामनगरमध्ये मतदान केले. म्हणाले, “आम्हाला एकट्याच्या जिवावर जादुई आकडा गाठण्याचा विश्वास आहे.”

– श्री श्री रविशंकर यांनीही कनकपुरा पोलिंग बूथवर मतदान केले.

– म्हैसूरच्या शाही परिवाराचे कृष्णदत्त चमारजा वाडियार यांनी म्हैसुरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

– माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी हासन जिल्ह्यातील होलेनरसिपुराच्या बूथ नंबर 224 मध्ये मतदान केले.

– एचडी कुमारस्वामी जयानगरमध्ये आदिचुंचनागिरी महासंस्थान मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ माहेश्वरी यांना भेटले.

– भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांनी बेंगळुरूमध्ये कोरमंगलाच्या कर्नाटक रेड्डी जनसंघ येथे मतदान केले.
– मतदानापूर्वी बादामीमधील भाजप उमेदवार बी श्रीरामुलू यांनी गायीची पुजा केली.
– हुबळीच्या बूथनंबर 108 वर व्हीव्हीपीएटी मशीन खराब असल्याने बदलण्यात आले.
– केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा यांनी पुत्तूरमध्ये मतदान केले. यावेळी मताची टक्केवारी वाढेल. लोकांना सिद्धरमैय्या यांना सत्तेबाहेर करण्याची इच्छा आहे. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर निघतील असेही ते म्हणआले.
– भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी शिमोगा येथील शिकारीपुरामध्ये मतदान केले. लोक सिद्धरमैय्या सरकारला कंटाळले आहेत. लोकांनी अधिकाखिद संख्येने मतदान करावे असे आव्हान त्यांनी केले. मतदानापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.

कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात एकूण 2655 उमेदवार उतरले आहेत. यातील 391 (15%) उमेदवार हे गुन्हेगारी प्रर्श्वभूमीचे आहेत, तर 883 (35%) उमेदवार हे कोट्याधीश आहेत. सर्वात जास्त संपत्ती काँग्रेसचे प्रियकृष्ण (1020 कोटी रूपये) यांची आहे, तर सर्वात कमी संपत्ती अपक्ष उमेदवार दिलीप कुमार (1 हजार रुपये) यांची आहे. काँग्रेस आणि डेजीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरमैय्या आणि एच डी कुमारस्वामी 2-2 मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, भाजपचे मुंख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा सिकारीपूरामधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत