कर्नाटक मध्ये कांटे कि टक्कर – त्रिशंकू विधानसभेचे अंदाज

बंगळुरू : रायगड माझा 

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येणे सुरू झाले आहे. 5 एक्झिट पोलपैकी 1 मध्ये काँग्रेस आणि 1 मध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. इतर 3 अंदाजांमध्ये त्रिशंकु विधानसभेची शक्यता दिसत आहे. 23 एप्रिल रोजीही न्यूज चॅनल आणि एजन्सीजनी ओपिनियन पोल जारी केले होते. बहुतांशमध्ये त्रिशंकु विधानसभा येणार असल्याचे समोर आले होते. भाजप-काँग्रेसमध्ये कांटे की टक्टर आणि जेडीएस किंगमेकर होणार असल्याचा दावा होता.

कर्नाटकचे 5 मोठे ओपिनियन पोल

23 एप्रिल रोजीही विविध न्यूज चॅनल आणि एजन्सीजनी ओपिनियन पोल जारी केले होते. बहुतांश पोलमध्ये त्रिशंकु विधानसभा येणार असल्याचे समोर आले होते. भाजप- काँग्रेसदरम्यान कांटे की टक्कर आणि जेडीएसचे किंगमेकरची भूमिका असल्याचा दावा करण्यात आला. सी-फोरने भाजपला सर्वात कमी 70 आणि एबीपी-सीएसडीएसने सर्वात जास्त 95 जागा दिल्या होत्या. काँग्रेसला सर्वात कमी 85 जागा एबीपी-सीएसडीएसने दिल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत