कर्नाटक विधानसभेतही काँग्रेसची बाजी, भाजपाची ऐनवेळी माघार

रायगड माझा ऑनलाईन टीम

कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही संपलेलं नाहीये. बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापुर्वी झालेली ही निवड जेडीएस-काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत