कल्याणमधला धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाने महिला पोलिसाला फरफटत नेले

कल्याण : रायगड माझा ऑनलाईन 

कल्याणमध्ये दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे. सामान्य नागरिकांना याचा नेहमीच फटका बसतो, मात्र मंगळवारी एकाने रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला चक्क फरफटत नेलं. नागेश अवालगिरी असे या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या आशा गावंड यांनी नागेश या रिक्षा चालकाकडे लायसन मागीतले मात्र नागेशने मुजोरी करत रिक्षा न थांबवता उलट भरधाव वेगाने पुढे नेली. त्यामुळे आशा गावंड रिक्षा सोबत काही अंतरावर फरफटत गेल्या. यावेळी नागरिकांनी आरडा ओरड करत रिक्षा अडवली आणि नागेशला पकडून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या घटनेत आशा गावंड गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर महात्मा फुले पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत