कल्याणमधील 104 वर्ष जुना पत्रिपुल पाडणार, मध्य रेल्वेवर ६ तासांचा मेगाब्लॉक

कल्याण : रायगड माझा वृत्त 

kalyan

कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो तोडण्यासाठी मध्य रेल्वे तयारी सुरू केली असून रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन पर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे .

एल्फिस्टन आणि अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या दुर्घटना नंतर रेल्वेच्या एका विशेष पथकाने रेल्वे लाईन वरून जाणारे आणि रेल्वे स्थानक मधील पादचारी पुलाची पाहणी केली होती त्यात कल्याण मधील 104 वर्ष जुना पत्रिपुल धोकादायक असल्याचे जाहीर करत 22 ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद करम्यात आला आणि 24 सप्टेंबर2018 पासून तोडण्याचा कामाला सुरुवात झाली , मात्र तो पूल रेल्वे लाईन वरून जात असल्याने तांत्रिक अडचण आल्याने धिम्या गतीने काम सुरू आहे .यामुळे होणारी शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .

इतिहास जमा होणार जुना पत्रिपुल …
104 वर्ष जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वे रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन या कालावधीत 6 तासांचा मेगाब्लॉक मध्ये 104 वर्ष जुना पत्रिपुल तोडणार असल्याने तो आता इतिहास जमा होणार आहे .

रेल्वे सेवा …विस्कळीत ….आणि बदल …
नविन बांधकामाकरीता जुना कल्याण पञीपूल तोडण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असून या दरम्यान रेल्वेतर्फे धीमी, जलद, पाचवी व सहावी लाईन यावर एक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण या सेक्शनवरील 51 किमी वर 14 इंटरसीटी ट्रेन (7 अप आणि 7 डाऊन), 15 मेल यांचा मार्ग वळविण्यात आला असून 4 एक्सप्रेस नियोजित ठिकाणाआधीच रद्द करण्यात येणार आहेत तर 10 एक्सप्रेस नियोजित पणे चालविल्या जातील तर 8 एक्सप्रेसची वेळ बदलण्यात आली आहे.

कल्याण जवळील पत्रिपुलाचे काम होणार असल्याने प्रवाश्यांचे हाल होऊ नये म्हणून सीएसटीएम ते डोंबिवली, ठाणे, कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या मार्गावर  विशेष लोकल  सोडण्यात येणार आहे .

जुना पत्रिपुल तोडण्याच्या कामाला मध्य रेल्वे ने रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन या कालावधीत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्रवाश्याना त्रास होऊ नये म्हणून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत तसेच सीएसटीएम ते डोंबिवली, ठाणे अश्या विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

जुना पत्रिपुल तोडण्याच्या कामाला रेल्वेने सुरुवात केली असून त्या परिसरात नवीन पत्रिपुल बांधण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली असून नवीन पूल बांधण्यासाठी रेल्वे ने मंजुरी दिली आहे. त्याचे डिझाइन ठेकेदार एक दोन दिवसात सादर करेल आणि ते डिझाइन आय आय टी कडे पाठविले जाईल त्यांची मंजुरी आणि रेल्वे ने जुना पत्रिपुल तोडताच एक महिन्यात नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. नवीन पत्रिपुल बांधण्याचे काम एका वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता राम जैस्वाल यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत