कल्याण-कर्जतदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for badlapur station

मध्य रेल्वेची वाहतूक आणखी एका ठिकाणी विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. यामुळे कर्जतच्या दिशेने जणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
कसारा आणि कल्याण मार्गावर कसारा-उबंरमाळी स्थानकादरम्यान सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आता दुपारी १ वाजेच्या सुमारास कल्याण- कर्जत मार्गावर मार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजीनात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तसंच प्रवाशांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत