कल्याण कर्जत राज्यामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

नेरळ : अजय गायकवाड

नेरळ येथील राजेंद्र गुरु नगर मधून जाणाऱ्या आणि कर्जत कल्याण राज्य महामार्गाला जोडणाऱ्या मार्गाला श्रीमती मीनाताई ठाकरे मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. श्रीमती मीनाताई ठाकरे यांच्या जयानिती निमित्त नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने नामफलकाचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण सरपंच जानव्ही साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.

नेरळ येथील राजेंद्रगुरु नगर येथील रहिवाश्यांनी कल्याण कर्जत राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला श्रीमती मीनाताई ठाकरे मार्ग करण्यात यावा असे नेरळ ग्रामपंचायतीला सूचित केले होते. त्यावरून राजेन्द्रगुरू नगर येथील रहिवाश्यांच्या मागणीवरून नेरळ ग्रामपंचायतीने या मार्गाचे नामकरण केले आहे. या नावाचे फलक मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या ८८ व्या जयंतीचे औचित्य साधून नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच जान्हवी साळुंके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी रायगड जिल्ह्या परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी श्रीफळ वाढवले.या वेळी माजी सरपंच सुवर्ण नाईक, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, सनी चंचे, केतन पोतदार,सदा शिंगवा,माजी कामगार नेते विजय मिरकुटे,राजेश गायकवाड ,जयवंत साळुंके,अंकुश दाभणे, किसन शिंदे, संजय मनवे,बंडू क्षिरसागर,आबा पवार,यासह महिला आणि स्थानिक प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत