कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटके सापडल्याने खळबळ

कल्याण : रायगड माझा वृत्त 

कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यलयासमोर एका रिक्षात स्फोटके ठेवण्यात आल्याच्या निनावी चिठ्ठीमुळे शुक्रवारी पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु केला. तत्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले त्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच एका रिक्षात चार डीटोनेटर व दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. पोलीस उपायुक्त कार्यालयासह तीन महत्वाची शासकीय कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारात स्फोटके सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका इमारतीमध्ये तीन महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यलय, पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यलय, दुसऱ्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे. अशा महत्वाच्या इमारतीच्या आवारातच स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावात राहणाऱ्या तीन शेतकरी महिला जमिनीच्या वादप्रकरणी प्रांत कार्यलयात आल्या होत्या. या महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या त्याच रिक्षात ही स्फोटके आढळली आहेत. त्यामुळे या महिलांनी रिक्षा चालकाला फसविण्यासाठी ही स्फोटके रिक्षात ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खडकपाडा पोलिसांनी ही स्फोटके जप्त करीत पुढील तपास सुरु केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत