कल्याण :मनसेसैनिकांचा पालिका मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा

कल्याण :रायगड माझा वृत्त 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील रस्त्यामधील जीवघेण्या खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला आहे . खड्डेमय रस्त्यांमुळे एकामागून एक बळी जाण्‍यायाची मालिका सुरू आहे. असे असतानाही पालिका प्रशासन व एमएस आरडीसी या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने पालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मनसेने एल्गार पुकारला आहे. मंगळवारी भरपावसात  मनसेसैनिकांनी  पालिका मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढला. व केडीएमसी च्या निष्क्रिय प्रशासन व उदासीन सत्ताधार्‍यांच्या भोंगळ कारभाराची प्रतिकात्मक तिरडी काढली. या मोर्चात खड्ड्यात जखमी नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी चौकशी करून १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले .येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास अधिकार्‍यांवर मनसे स्टाईलने कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने दिला .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत