कशेळे परिसरात होतोय वारंवार वीज पुरवठा खंडित!

कर्जत : अजय गायकवाड 

कशेळे परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याबाबत कशेळे ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. कशेळे परिसरात गेले काही महीने सातत्याने विज पुरवठा खंडित होत आहे. दिवसातून अनेक वेळा खंडित होणाऱ्या वीज पुरावठयामुळे वीजेवर काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांना आपल्या दुकानात विजेची वाट बघत रहावी लागते. परिणामी व्यावसायिकांना  आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. अनेकाना सातत्याने होणाऱ्या नुकसानामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थ्याना देखील सायंकाळी संध्याकाळी अभ्यास करता येत नसून महिलांना सुद्धा अनेक अडचणीना तोड़ द्यावे लागत आहे.  
महावितरणच्या कशेळे येथील  पॉवर हाऊसला ग्रामपंचायतीने मोफत जागा दिली, त्या वेळी कशेळे गावाला आम्ही वर्षाचे बाराही महीने 24 तास विज देऊ असा शब्द दिला होता. कशेळे विज केन्द्रातुन आजूबाजूच्या सर्व गावांना विज पुरवठा व्हावा याकरिता आमच्या गावाच्या चारही बाजूला अनेक शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या जामिनितुन पोल उभे केले असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे, परंतु इतर गावकऱ्यांची सोय व्हावी याकरिता ग्रामस्थांनी नुकसान सहन केले.
कशेळे गावाकरिता स्वतंत्र लाईन असावी अशी मागणी कशेळे ग्रामस्थांनी केली आहे. अधिकारी नेहमी आश्वासन देतात परंतु कार्यवाही करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. येत्या आठ दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास नाइलाजाने आम्हाला या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल. असा इशारा त्यांनी विद्युत मंडळाला दिलाय.
यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रदिचे उदय पाटील, जनार्दन खंडागळे, सचिन राणे, योगेश हरपुडे, जय बोराडे, समीर शिंदे, मंगेश सावंत उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत