कश्मीरमध्ये चकमक, हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्याचा लष्कराकडून खात्मा

श्रीनगर : रायगड माझा ऑनलाईन 

जम्मू आणि कश्मीरमध्ये हिंदुस्थानच्या लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन सुरू ठेवले आहे. पुलवामा जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या लष्कराच्या जवानांवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र गस्तीवरचे जवान सावध होते. त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. काही वेळापासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत एका दहशतवाद्याच्या खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या दहशतवाद्याकडे असलेले अत्याधुनिक शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळात चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाला लष्कराने घेरले आहे. तसेच या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे. अन्य दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत