कसाऱ्याजवळ मालगाडीचे तीन डबे घसरले

ठाणे :रायगड माझा वृत्त

कसाऱ्याजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेची वाहतूक तात्काळ दुसऱ्या ट्रॅकवरून वळवण्यात आल्याने त्याचा प्रवाशांना फारसा फटका बसला नाही.

आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास कसाऱ्याजवळ कंटेनर वाहून नेणाऱ्या मालगाडीचे तीन डबे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर त्याचा परिणाम झाला. मात्र मालगाडीचे डबे घसरल्याचे समजल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मध्य रेल्वेची वाहतूक आणि एक्सप्रेस गाड्या बाजूच्या ट्रॅकवरून वळविल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर त्याचा परिणाम जाणवला नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मालगाडीचे डबे बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं. दरम्यान, आज सकाळी मराठा संघटनेच्या आंदोलकांनी ठाण्यात रेल्वे रोको केल्याने आधीच मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. त्यात आता मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते की काय अशी भीती व्यक्त होत होती. मात्र रेल्वे प्रशासनाने वेळीच मध्य रेल्वेची वाहतूक दुसऱ्या ट्रॅकवरून वळविल्याने प्रवाशांची फारशी गैरसोय झाली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत