कसोटी संघ जाहीर ; अश्विन, रोहितला विश्रांती

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Team India

ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅडलेड कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठीचा भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. उद्या शुक्रवारपासून पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. रोहित शर्माला कंबरदुखीचा तर अश्विनला पोटाचा त्रास होऊ लागल्याने या दोघांनाही दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजा, भुवनेश्वर आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पृथ्वी शॉ सुद्धा दुखापतीतून अद्याप बरा झालेला नाही. त्यामुळे त्यालाही दुसऱ्या कसोटीत स्थान देण्यात आलेले नाही. अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ३१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठीचा भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत