काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा माणगाव नगरपंचायतीवर भगवा, राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

संपुर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माणगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत शिवसेनेने नगरपंचायतीवर भगवा फडकवला. काँग्रेस नेते ज्ञानदेव पवार यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देत हा इतिहास घडविला. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षादेश जारी करूनही राष्ट्रवादीच्या तीन नगरसेविकांनी पक्षादेश जुगारून देत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचत राष्ट्रवादीला जबरदस्त दणका दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा माणगाव नगरपंचायतीवर भगवा, राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

माणगांव नगरपंचायतीच्या  नगराध्यक्षपदाची व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवार 24 जुलै 2018 रोजी झाली. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून सौ. योगिता गणेश चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून  सौ. भाग्यश्री आनंद यादव या दोनच उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात होते. माणगांवच्या प्रातांधिकारी तथा पिठासन अधिकारी सौ. प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अधिपत्याखाली संपन्न झालेल्या निवडणूकीत बोट वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी शिवसेना काँग्रेसच्या सौ. योगिता चव्हाण यांच्या बाजूने 9 नगरसेवकांनी बोट वर करून मतदान केले तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. भाग्यश्री यादव यांच्या बाजूने 8 नगरसेवकांनी मतदान केले. उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार सौ. शुभांगी जाधव यांच्या बाजूनेही 9 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप जाधव यांना 8 मते मिळाली. निवडणूक प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर पिठासन अधिकारी सौ. प्रशाली जाधव दिघावकर यांनी माणगांव नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ. योगिता गणेश चव्हाण या तर उपनगराध्यक्षपदी सौ. शुभांगी उध्दव जाधव निवडून आल्याचे जाहिर केले.

या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेविका सौ. निलम राजेश मेहता, सौ. स्नेहा नितीन दसवते व सौ. शुभांगी उध्दव जाधव गैरहजर राहिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती व त्याचवेळी या निवडणूकीत सत्तापालट होण्याचे संकेत मिळाले होते.  दोन दिवसातच चित्र स्पष्ठ होत शिवसेना नेते राजीव साबळे व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार यांनी एकत्र येत हे राजकीय डावपेच आखल्याचे स्पष्ठ झाले होते.

यावेळी नगरपंचायतीत आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख रवी मुंडे, काँग्रेस नेते ज्ञानदेव पवार, शिवसेना नेते राजीव साबळे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल नवगणे,  तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, डॉ. नरेंद्र सिंह, रोहा माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, पं.स. सभापती राजेश पानवकर, युवा नेते वैभव साबळे, प्रशांत साबळे, जि.प. सदस्या अमृता हरवंडकर, स्वाती नवगणे, महिला संघटक साधना पवार, शर्मिला सुर्वे, तळेगांव सरपंच अरुणा वाघमारे, महेंद्र तेटगुरे, शहरप्रमुख अजित तार्लेकर, दुर्वास म्हशेळकर, युवा सेना अधिकारी कपिल गायकवाड, माजी उपसभापती शुभांगी साबळे, मारुती बोंबले, पंचायत समिती सदस्य सुजित शिंदे, भिमशक्तीचे रविंद्र मोरे, माजी उपसरपंच राजेश मेहता, नितीन दसवते, उध्दव जाधव, उणेगांव सरपंच राजु शिर्के, गणेश चव्हाण, नितीन दसवते, इब्राहीम करेल, माजी शहरप्रमुख महेंद्र दळवी, सुमित काळे, सिराज परदेशी, सचिन शिगवण, सुधीर पवार, अनिल सोनार, बाबू पाखुर्डे, चेतन गायकवाड, सुनिल पवार, इरफान हाजिते, गोरेगांव विभागप्रमुख मधूकर नाडकर, बाळु अंबुर्ले, वैभव मोरे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना काँग्रेस एकत्र येण्याचा उद्देश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची आलेली मस्ती उतरवण्यासाठी शिवसेनेला आपण बिनशर्त पाठींबा दिला आहे. अनेकवेळा आम्ही मित्रपक्षाला मत देत आलो पण त्यांनी आमचा कधीच विचार केला नाही. :  ज्ञानदेव पवार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस

 

या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 50 लाखापासून 1 कोटी रुपये देण्यापर्यत आमच्या नगरसेवकांना आमिषे दाखविली. या सर्वांचे आवाजाचे रेकाँर्डींग आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतू आमचे बहाद्दर शिवसैनिक पैशाला न भूलता प्रामाणिक राहिले. त्यामुळेच आजचा विजय सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षात काहीच कामे केली नाहीत. माणगांववर दादा साबळेंची श्रध्दा होती. नियोजनबध्द विकास त्यांना हवा होता पण तो तटकरेंच्या एकाधिकार शाहीमुळे होऊ शकला नाही. : राजीव साबळे शिवसेना नेते

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत