काँग्रेसच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

वाशी, नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

कोरोना काळात बहुतांश नेत्र चिकत्सकांनि आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळे नेत्र विकार असलेल्या नागरिकांची मोठी अडचण होत होती. आणि ही अडचण लक्षात घेऊन डाॅ.विजय बाबुशेठ पाटील , जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेस व इन्फिगो आय केअर सेंटर याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२० ते १ नोव्हेंबर २०२० पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर चा शुभारंभ ३०ऑक्टोबर २०२० रोजी इन्फिगो आय केअर, १ सी/२, वाशी बस डेपोच्या मागे, अपना बाजाराच्या वरती , सेक्टर ९ ए, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी झाले. या शिबिरात नागरिकांच्या मोतीबिंदू तपासणी, चष्याच्या नम्बरची तपासणी, रेटीना तपासणी, ग्लोकोमा तपासणी, रंग आंधळेपणा तपासणी, डोळ्यांची तिरळेपणा, डोळ्यांचा कोरडेपणा इत्यादी बाबत तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी डाॅ.विनोद बाबूशेट पाटील कार्यक्रमाप्रसंगी अनिकेत म्हात्रे प्रदेश युवक सरचिटणीस, नासिर हुसेन प्रवक्ता, किशोर पाटील, वाशी तालुकाध्यक्ष, बाबासाहेब गायकवाड, तुर्भे तालुकाध्यक्ष, महेश पाटील, सानपाडा-जुईनगर तालुकाध्यक्ष, सचिन नाईक,शार्दूल कौशिक,संदेश चौरे तालुका उपाध्यक्ष , भिमराव भोसले तालुका उपाध्यक्ष, किरण बोडके,रूबी सिंग, राजस भांबुरे ,सिद्धांत आवाडे वार्ड अध्यक्ष, बबन पाटील,रमेश चव्हाण, गणेश गायकवाड,संदीप कासवडे, चाॅंद पाशा, नाझिम इनामदार,खंडू लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत