काँग्रेसच्या सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

कोलाड : कल्पेश पवार 

26 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोलाड विभागात राजकीय हालचालींना वेग आला असून, कुडली येथील काँग्रेस सदस्य व कार्यकर्त्यांनी, माजी आमदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे कुडळी येथे या ग्राम.पंचायत निवडणुकीत विरोधकांना  हा मोठा धक्का आहे असे बोलले जात आहे.

कोलाड विभागात होऊ घातलेल्या,ग्रामपंचायत निवडणूकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे,त्यामुळे सर्वच ठिकाणी राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी,आणि  उमेदवार चाचपणी सुरू आहे. अशातच आपला पक्ष विरोधकांना शह देण्यासाठी कसा मजबूत होईल यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.त्यामुळे या विभागात रोज कुठे ना कुठे तरी राजकीय भूकंप होतच आहेत.

त्यातचं कुडली येथील रोहा कॉग्रेस सरचिटणीस अनंत वरे, संतोष वरे, माजी उपसरपंच सोनाली वरे आणि काही कार्यकर्ते यांनी माजी आमदार सुनील तटकरे, जि.प अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी,मोतीराम तेलंगे,सुरेश महाबळे, विनू पडवळ, रामदास तवटे,किसन पडवळ, लक्षुमन कामथेकर,विजय कामथेकर,संजय काम थेकर,संदीप कडू, दत्ता जाधव, प्रविण पोळेकर, आदी कार्यकरते उपस्थित होते.

ऐन ग्रामपंचायत निवडणूक काळात काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा पक्ष प्रवेश कुडली ग्रामपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी पक्षाला सुखद मानला जात असून, यंदाच्या निवडणूकित विरोधकाना हा जबरी धक्का असून येथे यावेळी सत्ता पालट होण्याची शक्यता कोलाड नाक्यात वर्तवली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत