काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात

रायगड माझा वृत्त 

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाव्यात यासाठी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच काँग्रेस पक्षाच्या विभागनिहाय बैठका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागांवर विजयी करण्याचा बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच प्रत्येक विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बाळासाहेब थोरात नव्याने रणनीती आखणार आहेत. विधानसभा तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या आढावा बैठकींना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची मतदारसंघातील स्थिती, यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मात्र त्या तुलनेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असताना वंचित आघाडीच्या भूमिकेवर आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत