काँग्रेसला २०१९ ची निवडणूक जड जाणार ? – ब्लूमबर्ग

नवी दिल्ली: रायगड माझा 

लोकसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष बाकी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच  काँग्रेससारखा सर्वात जुना पक्ष मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडे पैसाच उरलेला नाही. त्यामुळे काँग्रेसला २०१९ ची निवडणूक जड जाण्याची चिन्हे असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काँग्रेस पक्ष आर्थिक संकटात सापडला असल्याचा गौप्यस्फोट ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात करण्यात आला आहे. आर्थिक संकटामुळे गेल्या पाच महिन्यात काँग्रेसने अनेक राज्यांतील कार्यालयांना आर्थिक रसद पुरविणे बंद केले आहे. ‘तुमचा फंड तुम्हीच उभारा,’ अशा सूचनाही काँग्रेसकडून प्रदेश कार्यालयांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय पक्षासाठी आर्थिक योगदान देण्याचे आणिखर्चात कपात करण्याच्या सूचनाही प्रदेश कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्योगपतींकडून काँग्रेसकडे येणारी आर्थिक रसद कमी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना निधी उभारता उभारता नाकीनऊ येत आहेत. ‘भाजपच्या तुलनेत आमच्याकडे पैसे नाहीत,’ असं काँग्रेसचा सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनीही स्पष्ट केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत