काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचं कुटुंब-भाजपा

रायगड माझा वृत्त

काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचं कुटुंब आहे. यांनी इतका भ्रष्टाचार केला आहे की त्याला काहीही सुमार नाही. काँग्रेस पक्ष ऑगस्टा वेस्ट लँड घोटाळ्याचं रुपांतरही ऑगस्ट क्रांती आंदोलनात करण्याच्या तयारीत आहे असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. यांना असं वाटतंय की आपण जो काही भ्रष्टाचार केला आहे त्याचे रुपांतर क्रांतीत केलं जावं, असेही नक्वी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी याआधीही करून झाला आहे. तर राफेल करार, बेरोजगारी, लोकांचे प्रश्न, जनतेच्या आत्महत्या या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी तर जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावरूनही मोदींवर टीका केली आहे. या सगळ्याला उत्तर देण्यासाठीच आता मुक्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचं कुटुंब आहे असा आरोप केला आहे. याला आता काँग्रेस पक्षाकडून कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत