काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची माफी मागावी : मुनगंटीवार

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त 

कोणत्याही विरोधी आमदाराला आमच्याकडून संपर्क केला गेल्या नसल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आमदारांच्या फोडाफोडीचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपावर काँग्रेस-राष्ट्रवादीने करण्यात आलेला घोडेबाजाराचा आरोप खोटा आहे. हा आरोप म्हणजे त्यांच्याच आमदारांचा आणि राज्यातील मतदारांचा अवमान आहे. कोणाला फोन आले असतील तर त्यांनी कॉल रेकॉर्ड काढावा आणि तो समोर आणावा. कोणत्याही क्षणी कोंडी फुटेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. सत्तास्थापनेच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना एकत्र करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याच्या सुचना दिल्या.  सरकार महायुतीचे बनेल यावर आम्हाला विश्वास आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत