कांबळीची पत्नी अँड्रियाने अंकित तिवारीच्या वडिलांवर उचलला हात, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप

मुंबई : रायगड माझा 

क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया यांच्या विरोधात गायक अंकित तिवारीचे वडील आर.के.तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विनोद कांबळी आणि अँड्रियाने मॉलमध्ये मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर याबाबत विनोद कांबळी याने, आर.के.तिवारी यांनी अँड्रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे सांगितले आहे. हा वाद झाला तेव्हा अँड्रियाने तिवारी यांच्यावर रागात सँडल उगारली होती, असेही समोर येत आहे. मालाडमधील इनऑर्बिट मॉलमध्ये हा सर्व वाद घडल्याचे समोर आले आहे.

रविवारी दुपारी हा प्रकार घडला. मालाडमधील इनऑर्बिट मॉलमध्ये अंकित तिवारीचे वडील आर.के.तिवारी आणि अंकितचा लहान भाऊ अंकुर तिवारीही गेला होता. त्यावेळी आर.के.तिवारी अँड्रिया तिवारीच्या बाजुने जात असताना अँड्रियाने अचानक त्यांच्यावर हात उचलला. त्यावरून त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाले. त्यावर तिवारी यांनी अँड्रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे विनोद आणि अँड्रिया यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तिवारी यांचा अँड्रियाला स्पर्श झालेला दिसत आहे. पण तो ठरवून केलेला होता की चुकून झाले हे मात्र स्पष्ट नाही. अँड्रियाने तिवारी यांच्यावर सँडलही उगारली होती, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर झालेल्य वादानंतर तिवारी यांनी पोलिसांत तक्रार केली. बांगुर नगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

काय म्हणाला कांबळी..
कांबळीने याबाबत बोलताना सांगितले की, एका वयस्कर व्यक्तीने माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यावर माझ्या पत्नीने त्याचा हाच धरला आणि त्याला धक्का दिला. त्यावेळी आम्ही गेम झोनजवळ होतो. त्याठिकाणी काही बोलाबोली झाली. त्यानंतर आम्ही फूड कोर्टमध्ये होतो तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या एकाजणासह त्याठिकाणी आला. तो कदाचित त्यांचा मुलगा असावा. त्यांनी अँड्रियावर अचानक हल्ला केला. मी त्यांना विरोध केला त्यावर आम्ही कोण आहोत, तुला माहिती नाही, अशा धमक्या दिल्याचे विनोदने सांगितले. तिवारी गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते असे अँड्रिया म्हणाली.

काय म्हणाला अंकुर..
अंकितचा भाऊ अंकुरने सांगितले की, मी माझी पत्नी आणि मुलीसह वडिलांना घेऊन गेलो होतो. माझे वडील मुलीबरोबर गेमझोनमध्ये गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. वडिलांना याबाबत धक्का बसला होता. त्यांच्यावर असा आरोप झाल्याने ते गोंधळले होते. त्यामुळे मी बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. पण त्यांनी मलाही धक्का दिला आणि कांबळीच्या पत्नीने आमच्यावर सँडल उगारले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत