कानपूरमधून १०० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

रायगड माझा

नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानंतरही जुन्या नोटांचे घबाड काही संपताना दिसत नाही. कानपूरमध्ये तब्बल 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटा गादीमध्ये होत्या. अशा तीन गाद्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा असल्याची माहिती कानपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून आधी 80 कोटीच्या नोटा जप्त केल्या. आता हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे अटक केलेल्यांपैकी एकाचा नातेवाईक RBI चा कर्मचारी आहे. एका बिल्डर आणि कपडा व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. यात जुन्या नोटा बदलून देणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा संशय आहे. कानपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत