कानातील मळाचा थेट संबंध हृदयरोगाशी

रायगड माझा वृत्त 

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण-तणावाचे काम व वाढते प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे हृदयासंबंधीचे आजार सध्या बळावत आहेत, असे विशेषज्ज्ञ सांगतात. मात्र, नुकत्याच एका नव्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, ज्या लोकांच्या कानात घाण (मळ) साचलेली असते, तेसुद्धा हृदयरोगाच्या विळख्यात सापडू शकतात.

 

जगभरात हृदयाशी संबंधित असलेल्या आजाराने दरवर्षी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. एकट्या भारतातच दरवर्षी सुमारे 17 लाख लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. यासंदर्भात नव्या संशोधनात एक नवे तथ्यच समोर आले आहे. ते म्हणजे ज्या लोकांच्या कानात घाण (मळ) साचलेली असते, म्हणजे सुमारे 95 टक्के लोक जे कानाच्या विकाराने त्रस्त असतात, त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. मुंबईतील एक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी सुमारे अशा 888 रुग्णांवर संशोधन केले की, जे मधुमेह, उच्च रक्‍तदाबाने त्रस्त होते. यामध्ये त्यांना असे आढळून आले की, यातील 95 टक्के म्हणजे 508 लोकांचे कान घाणीने भरले होते आणि ते हृदयरोगाने त्रस्त होते.

तसे पाहिल्यास वयाच्या साठीनंतर लोकांमध्ये कानात मळ साचणे, ही एक सामान्य बाब असली तरी अशा लोकांनाही हृदयरोगाचा जास्त धोका असतो. आता ही समस्या सर्वसामान्यच झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत