कापडिया मार्केटची शतकी वाटचाल अंधकारामय ! – प्रशासनाचे दुर्लक्ष

 माथेरान – मुकुंद रांजाणे

अनेकांच्या जीवनातील चढउतार अन स्वतः अंगमेहनत करणाऱ्या कष्टकऱ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी उन्हातान्हात तर पावसाळा असो किंवा अतिवृष्टी असो प्रत्येकाचा आधारस्तंभ बनून येणाऱ्या प्रत्येक संकटानाच उराशी कवटाळून सुखाचे दोन घास देऊन एक खंबीरपणे आधारवड बनून आजही त्याच दिमाखात ताठ मानेने उभ्या असलेल्या तसेच शतकी वाटचाल करीत असताना देखील काही भागातील अंगाची लखत्तरे अस्ताव्यस्त झालेली आहेत तरीसुद्धा उतारवयात पण मायेची पाखर अन आश्रयाची सावली देत असतांना केवळ ज्यांच्यासाठी एवढा खटाटोप सुरू आहे त्याच कापडिया मार्केटची केविलवाणी दशा नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे वाताहत झालेली आहे.अनेक गाळे हे जवळपास चार दशकांपासून बंद अन मोडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे या मार्केटचा एकंदरीत भाग अत्यंत गलिच्छ दिसत आहे. तर काही गाळे हे वापरविना तसेच पडून आहेत.

त्यावेळेस बाई रतनबाई ह्या माथेरान मध्ये दि.२९ एप्रिल १९१७ रोजी माथेरत मध्ये मयत झाल्या होत्या त्यांच्या स्मरणार्थ पेस्तनजी नौरोजी कापडिया यांनी १९१९ मध्ये माथेरानच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कपाडिया मार्केट बांधून नगरपालिकेकडे हस्तांतरण केले होते. एका विशिष्ट आकारणी पद्धतीने ह्या एकूण दोन एकरांच्या जागेवर लहानमोठे व्यावसायिक गाळे तसेच पूर्वेकडील बाजूला पिठाच्या गिरणी उभारलेल्या आहेत. ह्या गिरणी अनेक वर्षांपासून बंद अन त्यावरील छप्पर गायब झालेले आहे. भिंती कोसळल्या आहेत. एकंदरीतच या ठिकाणी बकालपणा अन भग्नावशेष गिरण्या ह्या नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे आलेला आहे. अनेक गाळे हे बंद आहेत ते सुरू केल्यास त्याचप्रमाणे गाळ्यांची डागडुजी, दुरूस्ती करणे गरजेचे आहे. तर काही गाळे धारकांनी आपल्या नावे असलेले गाळे वार्षिक भाडेतत्त्वावर दिलेेेले आहेत.ज्यांना हे गाळे सुरू करावयाचे नाहीत त्यांनी नगरपालिकेकडे वर्ग करून गरजवंतांसाठी ,महिला बचत गट तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार नाही.मुख्य रस्त्यावर उन्हातान्हात, पावसाळ्यात व्यवसाय करणाऱ्या गरजवंतांसाठी (हॉकर्स ) लोकांना ज्यांना खरोखरच उत्पनाचे काहीएक साधन नाही अशांनाच देखील येथील मोकळ्या जागेत व्यवसाय करता येऊ शकतो. त्यांचाही प्रश्न या निमित्ताने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली करणे आवश्यक आहे.
———————————————————
कापडिया मार्केट हे २०१९ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. माथेरानच्या मध्यवर्ती ठिकाणाचे हे आकर्षण तसेच शान आहे.इथले अनेक गाळे बंद तसेच पडलेल्या अवस्थेत आहेत त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला कळविले असून या भागाची संपूर्ण डागडुजी दुरूस्ती केल्यास या मार्केटला गतवैभव प्राप्त होईल.त्याबाबत आम्ही सुद्धा आमच्या परीने प्रयत्नशील आहोत.फुटपाथ वर बसणाऱ्या व्यावसायिकांना इथे व्यवसाय सुरू करता येईल.
प्रेरणा प्रसाद सावंत – नगराध्यक्षा माथेरान नगरपालिका
——————————————————–
या मार्केटचे सुयोग्य पद्धतीने नियोजनबद्ध देखभाल अन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गाळ्यांमध्ये बाहेरील जागेत वाढीव बांधकामे केलेली आहेत त्यांच्याकडून अधिक भाडे वसुली केल्यास नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल.
शिवाजी शांताराम शिंदे– विरोधी पक्ष नेते माथेरान नगरपालिका
———————————————————
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत