कापड तयार आहे, वेळ येईल तेंव्हा लंगोटही शिऊ : गिरीश महाजनांचा गुलाबरावांना टोला

जळगाव : रायगड माझा वृत्त

शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील पैलवान आहेत, ते लंगोट खिशात घेवूनच फिरतात. मात्र युतीचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. त्यांच्या व माझ्याही हातात हा निर्णय नाही. मात्र जर लढायची वेळ आली तर आमच्याकडे कापड तयार आहे, लंगोट शिवून, तेल लावून आम्ही कुस्ती खेळण्यास तयार राहू. एक मात्र निश्‍चित यात विजय आमचाच होईल असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांना लगावला.

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना उपनेते व सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी युती झाली नाही तर आम्ही लोकसभा स्वबळावर लढण्यास लंगोट लावून तयार आहोत असे मत व्यक्त केले होते. त्याला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले, गुलाबराव मोठे पैलवान आहेत, ते लंगोट खिशातच घेवून फिरत असतात, परंतु “युती’ चा विषय त्यांच्या व माझ्याही हातात नाही, वरिष्ठच त्याबाबत निर्णय घेणार आहेत. युती झाली तर त्याचा फायदा दोघानाही होईल. मात्र नाही झाली तर आम्ही लंगोटाचे कापड आमच्याकडेही आहेच, शिलाई करण्यास फार वेळ लागत नाही. लंगोट लावून तेल लावूनही आम्ही कुस्ती खेळण्यास आम्ही सज्ज होवू मात्र यात विजय आमचाच होईल हे निश्‍चित आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत