कामगारांचा आधारवड हरपला : श्याम म्हात्रे यांचे निधन!

पनवेल : रायगड माझा वृत्त 
कामगार नेते आणि अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रेयांचे आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. खांदा कॉलनी येथील निवासस्थानातून दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
श्याम म्हात्रे यांच्यावर दादर येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असं कुटुंब आहे. त्यांच्या निधनाने कामगारांचा आधारवड हरपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गरीब, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त कामगार यांच्या न्याय्य हक्कांसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. राज्यातील विविध शासकीय महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंबई, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आंदोलने केली होती.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत