कामगार रुग्णालयातील मृतांची संख्या 10 वर

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

अंधेरीच्या मरोळ परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला आहे. गुरुवारी आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हा आकडा 10वर पोहोचला आहे.

सोमवारी कामगार रुग्णालयात दुपारी 4 च्या सुमारास चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरबाहेर आगीचा भडका उडाला. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती संपूर्ण मजल्यावर पसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले असून 160 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत