कारखाना व्यवस्थापनाला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या तंबी

नियमांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई…

खालापूर : मनोज कळमकर 

खालापूर तालुक्यातील अनेक कारखान्यात सुरक्षा नियम पायदळी तुङवले जात असून याबाबत कारखाना व्यवस्थापकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विजय पांढरपट्टे यांनी तंबी दिली आहे.

खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकित व्यक्त केले.खालापूर तालुक्यात सुमारे तीनशेच्या आसपास कारखाने असून मागील काहि महिन्यात कारखान्यात आग लागण्याच्या वाढत्या घटना ,परप्रांतीय कामगारांचा गुन्ह्यात सहभाग,अपघाताच्या वाढत्या घटना तसेच औद्योगिक कलह यामुळे खालापूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.त्या अनुषंगाने कारखाना व्यवस्थापकांना मार्गदर्शन व चर्चा व्हावी यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरपट्टे यांनी कारखान्यातील परप्रांतीय कामगारांची इत्यंभूत माहिती ठेवणे आवश्यक असून आवश्यक ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेरे बसवावे अशी सूचना दिल्या.याशिवाय 26 भंगार व्यावसायिक पोलीस रेकाॅर्ङवर गुन्हेगार असून त्यांच्याशी कारखान्यानी कोणतेही प्रकारचे व्यवहार करू नये अशी ताकिद पांढरपट्टे यांनी दिली.बंद कोपरान कारखान्याला लागलेली आग,भूषण स्टिल तसेच प्रासोल कारखाना विषयी मध्यंतरी झालेले वाद यामुळे कायदा सुव्यवस्थेवर ताण आला होता .अनेक कारखान्यात कामगारांना सुरक्षा उपकरणे पुरवली जात नसल्यामुळे अपघात होत असून कारखाना व्यवस्थापनाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून अपघाताच्या घटना घङल्यास संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे खङे बोल पांढरपट्टे यांनी सुनावले.या बैठकीला खोपोलीचे पोलीस निरीक्षक घुटूकोङ,रसायणीचे पोलीस निरीक्षक जगदाळे,खालापूरचे पोलीस निरीक्षक जमील शेख तसेच विविध कारखान्याचे अधिकारी ऊपस्थितत होते.

भूषण स्टिल कारखान्याचे उदाहरण देताना कारखान्यात नेहमी युनियनच्या माध्यमातून वाद करून वातावरण दूषित करणा-या युनियन प्रतिनिधीला तङीपार केल्याचे उदाहरण पांढरपट्टे यांनी देत कारखाना सुरळीत सुरू राहण्यासाठी पोलिसांचे सहकार्य राहील अशी हमी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत